GPS Waypoints अप्लिकेशन (GPS Waypoints application)
पृथ्वीच्या पृष्ठभागावरील कोणत्याही ठिकाणाचे अक्षांश व रेखांशाचे नेमके स्थान जागतिक स्थान निश्चिती प्रणालीच्या (Global Positioning System - G.P.S.) सहाय्याने केले जाते. भूमी सर्वेक्षण, जलविज्ञान सर्वेक्षण, वसाहत सर्वेक्षण, अपतटीय संरचना, पुरातत्व नकाशामध्ये बिन्दूची निश्चिती, वाहतूक व्यवस्थापन, रस्ते व पुलांची निर्मिती, पाईपलाईन, धरणांचे बांधकाम, जलमार्ग इत्यादीमध्ये जीपीएसचा उपयोग होतो.
जीपीएस संकेत प्राप्त करण्यासाठी एका रिसिव्हरची आवश्यकता असते ज्याद्वारे Navigation व ज्योडेटीक स्थिती निश्चित केली जाते. परंतु सध्याच्या युगात स्मार्टफोनचा उपयोग जीपीएस रिसिव्हर म्हणून देखील करू शकतात. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वरून ‘GPS Waypoints’ हे अॅप्लीकेशन स्मार्टफोनमध्ये install करावे लागते. परंतु त्यासाठी स्मार्टफोन हा ‘अॅनड्राईड’ (Android) ऑपरेटिंग सिस्टीम (Operating System) असणारा व ‘जीपीएस’ फिचर असणारा असणे आवश्यक आहे. स्मार्टफोनमध्ये स्थान निश्चिती ऑफलाईन (offline) मोडमध्येही करता येते त्यासाठी इंटरनेटची गरज लागत नाही.
GPS Waypoints:
‘GPS Waypoints’ अॅप्लीकेशन download करण्यासाठी https://play.google.com/store/apps/details?id=pt.bluecover.gpsegnos या लिंकवर क्लिक करून install करा.
‘GPS Waypoints’ अॅप्लीकेशनमध्ये कोणत्याही स्थानाचे अक्षांश (Latitude), रेखांश (Longitude), समुद्रसपाटीपासूनची उंची (Alitude MSL), गती (Speed), दिगांश (Bearning) व अचूकता (Accuracy) याबाबतची नोंद Add to waypoint व Add to path याद्वारे करता येते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बिंदूच्या (Point) स्वरूपातील घटक (उदा. झाड, विहीर ईत्यादी) Add to waypoint च्या सहाय्याने व रेषेच्या (line) स्वरूपातील घटक (उदा. रस्ते, नदी ईत्यादी) Add to path च्या द्वारे दर्शिविले जातात. नोंद केलेले waypoint व path हे .gpx व .kml या फॉरमॅटमध्ये स्मार्टफोनच्या internal storage-GPS waypoint या फोल्डरमध्ये export करता येतात तसेच share सुद्धा करता येतात. गुगल अर्थ (Google Earth) या सॉफ्टवेअरमध्ये .kml या फॉरमॅटची फाईल ओपन करता येते व नोंद केलेले waypoint व path गुगल अर्थ मध्ये बघता येतात. स्मार्टफोनमध्ये अचूकतेचे प्रमाण ३ मी. पर्यंत असू शकते.
- अशाप्रकारे स्मार्टफोनच्या सहाय्याने जीपीएस रिसिव्हरचा उपयोग न करता पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध घटकांची माहिती प्राप्त करता येते.
0 Comments