माण नदी खोऱ्यातील दुष्काळ प्रतिरोधक पिकांसाठी अनुकुल प्रदेश (Site Suitability for Drought Resistant Crops in Man River Basin)


प्रस्तावना: (Introduction)
जगभरात दुष्काळ मुख्य पर्यावरणीय समस्या असून वनस्पतींचा विकासावर तसेच कृषी उत्पादनावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. दुष्काळामुळे मृदेतील पाण्याची उपलब्धता कमी होत जाते आणि पिकांचा नाश होतो. परंतु मर्यादित पाण्याच्या वातावरणातही काही पिके टिकून राहू शकतात आणि दुष्काळी वातावरणात समायोजित होतात. अशा पिकांना दुष्काळ प्रतिरोधक पिके म्हणून ओळखले जातात. दुष्काळ प्रतिरोधक पिकामध्ये बाजरी (Pearl Millet),  ज्वारी (Sorghum), जौ किंवा सातू (Barley), मका (Maize), हरभरा (Chick Pea), तूर (Pigeon pea), वाटणा (Cowpea) आणि भुईमुग (Groundnut)  इत्यादी पिकांचा समावेश होतो.
The International Centre for Tropical Agriculture यांनी Biodiversity International and the International potato centre (CIP) यांच्या सहकार्याने Food and Agricultural Organization (FAO) यांच्या माहितीच्या आधारे पिकांच्या पर्यावरणीय आवश्यकतेनुसार ‘Eco-Crop’ प्रतिमान विकसित केलेले आहे.  Eco-Crop प्रतिमांनानुसार DIVA-GIS या सॉफ्टवेयरच्या सहाय्याने जागतिक हवामान डेटाबेस मधील (World Climate database) तापमान आणि पर्जन्य या मापदंडाचा (Parameter) उपयोग करून विविध प्रकारच्या हवामान प्रदेशात दुष्काळ प्रतिरोधक पिकांसाठी अनुकूल प्रदेश निश्चित करण्यात येतो.

माण नदी खोऱ्यातील दुष्काळ प्रतिरोधक पिकांसाठी अनुकुल प्रदेश :

(Site Suitability for Drought ResistantCrops in Man River Basin)


               माण नदीचा खोरे (Man River Basin)  हा दुष्काळग्रस्त प्रदेश म्हणून ओळखला जातो. Eco-Crop प्रतिमांनानुसार DIVA-GIS या सॉफ्टवेयरच्या सहाय्याने जागतिक हवामान डेटाबेस मधील (World Climate database) तापमान आणि पर्जन्य या मापदंडाचा (Parameter) उपयोग करून माण नदीच्या प्रदेशात दुष्काळ प्रतिरोधक पिकांसाठी (बाजरी, ज्वारी, जौ किंवा सातू, मका, हरभरा, तूर, वाटणा आणि भुईमुग) अनुकूल प्रदेश नकाशाच्या सहाय्याने दर्शिवण्यात आलेला आहे. माण नदीच्या खोरे दुष्काळ प्रतिरोधक पिकांच्या उत्पादनासाठी अनुकूल असलेले दिसून येते. त्यामध्ये माण नदीचे संपूर्ण खोरे ज्वारी पिकासाठी अत्यंत अनुकूल आहे. माण नदी खोऱ्याचा पूर्व भाग दुष्काळ प्रतिरोधक पिकांच्या उत्पादनासाठी उपयुक्त आहे.


अधिक माहितीसाठी वाचा : http://www.jcsonline.in/5,%202(2017)%2026-31.pdf
Site Suitability for Chick Pea Crop in Man River Basin
Site Suitability for Cow pea in  Man River Basin 
Site Suitability for Groundnut in  Man River Basin 
Site Suitability for Maize in  Man River Basin 
Site Suitability for Pearl Millet in  Man River Basin 
Site Suitability for Pigeon pea in  Man River Basin 
Site Suitability for Sorghum in  Man River Basin 
Site Suitability for Barley in  Man River Basin




तक्ता क्रमांक १: माण नदी खोऱ्यातील दुष्काळ प्रतिरोधक पिकांसाठी अनुकूल क्षेत्रफळ 

Drought Resistant Crop Suitability area in Man River Basin