दुष्काळाचे निरीक्षण आणि मुल्यांकन (Drought Assessment and Monitoring) 

       

पाणी मानव आणि सजीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी आणि त्यांच्या विकासाठी अत्यंत आवश्यक आहे. प्राचीन काळापासून मानवी वसाहती जवळपास आढळतात. पाण्याची उपलब्धता विकासासाठी प्रोस्ताहित करते आणि त्याच्या कमतरतेमुळे विनाश घडून येतो. जागतिक बँकेचे माजी उपाध्यक्ष इस्माईल यांच्या मते, पुढील शतकातील युद्ध तेलासाठी न होता पाण्यासाठी होईल.

       पृथ्वीवरील एकूण  पाण्यापैकी ९७.२ टक्के पाणी महासागर व सागरामध्ये (Oceans)  आहे. हिमनदी व बर्फाच्या (Glaciers) स्वरूपात पाण्याचे प्रमाण २.१५ टक्के आहे. भूजलाचे (Groundwater) प्रमाण ०.६२ टक्के आहे. गोडया पाण्यातील तलावामध्ये (Freshwater Lakes) ०.००९ टक्के असून खारे पाण्याच्या तलावात आणि अंतर्गत समुद्रामधील (saline lakes and inland seas) पाण्याचे प्रमाण ०.००८ टक्के इतके आहे. वातावरणातील (Atmosphere) पाण्याचे प्रमाण ०.००१ टक्के असून प्रवाह प्रणालीमध्ये (Stream channels) फक्त ०.०००१ टक्के इतकेच  आहे.

जलशास्त्रीय घटना: (Hydrological Extremes)

       भूकंप, त्सुनामी, भूमिपात, चक्रीवादळे, दुष्काळ, महापूर व पर्यावरणीय ऱ्हासामुळे पृथ्वीवर विनाशकारी प्रभाव पडत असतो. यापैकी पाणी हे महापूर व दुष्काळ या दोन्हीशी निगडीत  आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाणी स्थिरच राहते परंतु त्याचे वितरण स्थान आणि वेळ यानुसार अनियमित असते. ज्यावेळी एखाद्या प्रदेशात महापूर आलेला असतो त्यावेळी दुसऱ्या प्रदेशात दुष्काळाचा अनुभव येत असतो. म्हणून दुष्काळ आणि महापूर हे लोकासाठी आणि शासनासाठी विविध काळात एक आव्हान असतात. महापूर घटक परिणामासह जलद प्रक्रिया असून पाण्याची वाढ शक्तिशाली असते. परंतु काही कारणामुळे दुष्काळात नैसर्गिक धोके सर्वात जास्त घटक आहेत. प्रथम ते एक नियमित स्वरुपात असून त्याचे निर्धारण करणे कठीण असते. तसेच दुष्काळ संपल्यावर त्याचे परिणाम दीर्घकालपर्यंत असतात. दुसरे म्हणजे यामुळे दुष्काळ खरोखरच घडत आहे कि नाही याबद्दल गोंधळ वाढतो आणि जर असेल तर त्याची तीव्रता. तिसरा, दुष्काळ क्वचितच structural हानीची निर्मिती करतो. म्हणूनच इतर नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीपेक्षा त्याचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम कमी स्पष्ट असतात.

 दुष्काळाची व्याख्या: (Definition of Droughts)

       दुष्काळाची सर्वमान्य व्याख्या करणे कठीण आहे. एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात व एका व्यक्ती समूहातून दुसऱ्या व्यक्ती समूहात दुष्काळाबाबतच्या विविध कल्पना व धारणा आहेत. परंतु यामधील समान वैशिष्ट्ये म्हणजे पाण्याची कमतरता.

       नैसर्गिक हवामान चक्रामध्ये दुष्काळ एक दीर्घकालीन कोरडा कालावधी आहे. दुष्काळ पाण्याच्या कमतरतेमुळे घडणारी प्रक्रिया असून एक धीमी गतिमान घटना आहे. (World Health Organization - WHO)  

       दुष्काळ एक जटील नैसर्गिक आपत्ती असून ज्यामुळे सर्व हवामान आणि सामाजिक आर्थिक प्रभावामध्ये परिणाम दिसून येतो. कृषी क्षेत्र पहिले आणि सर्वात जास्त प्रभाव पडणारे क्षेत्र आहे. (Food and Agriculture Organization- FAO)

       दुष्काळ एक वृष्टीच्या कमतरतेचा एक दीर्घकालीन कालावधी असून पिके नष्ट होतात व उत्पादनात घट होते. (National Drought Mitigation Centre)

       दुष्काळ नेहमीचा असून हवामानाचे एक वैशिष्ट्य आहे आणि ते सर्व हवामानात आढळतो. तसेच सामान्यपणे  त्याचा स्थानिक विस्तार, तीव्रता व कालावधीच्या दृष्टीने त्याचे वर्णन केले जाते. (Ministry of Water Resources)

       दुष्काळ हा सामान्यपणे हंगामात किंवा यापेक्षा अधिक कालावधित वृष्टीमध्ये नैसर्गिक घट होण्याचा परिणाम आहे. त्याचबरोबर हवामानाचे इतर घटकही दुष्काळाशी संबंधित आहेत ते दुष्काळाची तीव्रता वाढवू शकतात. (Indian Meteorological Department- IMD) 

 

दुष्काळाचे प्रकार: (Types of Droughts)

      The National Commission of Agriculture’ यांनी दुष्काळास तीन प्रकारात विभाजित केले आहे. ते पुढीलप्रमाणे-

 १. हवामानविषयक दुष्काळ: (Meteorological Droughts)

      हवामानविषयक दुष्काळ एखाद्या परिस्थितीच्या रुपात परिभाषित केला जातो जेव्हा एखाद्या क्षेत्रावर सरासरी पावसाचे प्रमाण १० टक्के पेक्षा कमी असते. 

२. कृषिविषयक दुष्काळ: (Agricultural Droughts)

       कृषी दुष्काळ ही अशी स्थिती असते जेंव्हा मृदेची आर्द्रता आणि पर्जन्य निरोगी पिकांच्या वाढीसाठी अपुरी असते. 

३. जलजन्य दुष्काळ: (Hydrological Droughts)

       जलजन्य दुष्काळामध्ये दीर्घकालीन हवामानविषयक दुष्काळामुळे पृष्टभागावरील जलसंसाधने कमी होतात.

       दुष्काळाचा प्रभाव हवामानविषयक, कृषिविषयक व जलजन्यविषयक दुष्काळाशी संबंधित आहे. हवामानविषयक दुष्काळामुळे कृषी प्रभावित होते. त्यांनतर जलाशय, प्रवाह प्रणाली व भूमिगत पाणी कमी होते. जेंव्हा हवामानविषयक दुष्काळ संपतो तेंव्हा जमिनीचा ओलावा पुन्हा भरून येतो म्हणून कृषिविषयक दुष्काळ संपतो. जलजन्य दुष्काळ संपण्यासाठी बराच कालावधी लागतो. 

 दुष्काळाचे निर्देशांक: (Drought Indices):

       दुष्काळाचे हवामानविषयक दुष्काळ, कृषिविषयक दुष्काळ व  जलजन्य दुष्काळ असे तीन प्रकार पडतात. जगात विविध विचारवंतानी दुष्काळ निश्चित करण्यासाठी विविध निर्देशांक विकसित केलेले आहेत. ते पुढीलप्रमाणे: 

1. हवामानविषयक दुष्काळाचे निर्देशांक: (Meteorological Drought Indices)

 Indian Meteorological Department (IMD) method, Normalized Deviation (ND), Dryness Index (DI), De Martun’s Quotient (IA), Aridity Index (AI), Pluvothermic Quotient (PQ), Relative Precipitation Index (RPI), Effective Drought Index (EDI), Drought Severity Index (DSI), Standardized Precipitation Index (SPI), Accumulated Negative Moisture Index (NMI), Palmer Drought Severity Index (PDSI), Reclamation Drought Index (RDI) and Climatic Water Balance (CWB)

2. कृषिविषयक दुष्काळाचे निर्देशांक: (Agricultural Drought Indices)

Agrohydropotential (AHP), Palmers’ Z-index, Index of Moisture Adequacy (IMA),  Moisture Drought Index (SMDI), Evapotranspiration Deficit Index (ETD), Normalized Difference Vegetation Index (NDVI), Monthly Vegetation Condition Index (MVCI), Crop Moisture Index, Vegetation Condition Index (VCI), Soil Moisture Index (SMI), Crop Yield Reduction (YR).

3. जलजन्य दुष्काळाचे निर्देशांक: (Hydrological Drought Indices)

Surface water supply index (SWSI), reservoir storage index, water requirement satisfaction index (WRSI)

दुष्काळाचे मुल्यांकनात  सुदूर संवेदन व जीआयएस तंत्राचे  महत्व: (Significance of Remote Sensing and GIS in Drought Assessment)

      दुष्काळाची स्थिती व तीव्रता निश्चित करण्यासाठी सुदूर-संवेदन व जीआयएस तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. उपग्रहातील संवेदक दुष्काळामुळे होणाऱ्या वनस्पतीबाबतची अभिक्षेत्रीय माहिती पुरवित असतात आणि दुष्काळाच्या स्थितीचे अभिक्षेत्रीय प्रमाण मोजण्यासाठी सदर माहिती अधिक मूल्यवान असते. पिके आणि कृषी विषयक दुष्काळाचे मुल्यांकन करण्यासाठी उपग्रह सुदूर संवेदन व जी.आय.एस. तंत्राचा उपयोग सामान्यपणे केला जातो.

       उपग्रह माहितीवर आधारित विविध प्रकारचे दुष्काळ निश्चित करण्यासाठी वनस्पतीवर आधारित निर्देशांक तयार केले आहेत. त्यामध्ये vegetation index, infrared percent vegetation index, perpendicular vegetation index, soil adjusted vegetation index, weighted difference vegetation index, greenness vegetation index, atmospherically resistant vegetation index, normalized difference vegetation index, normalized difference wetness index, enhanced vegetation index and vegetation condition index यांचा समावेश होतो.

       पिके आणि कृषी दुष्काळाचे मुल्यांकन करण्यासाठी उपग्रह संवेद्काचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. उपग्रह माहिती वारंवार उपलब्ध आहे आणि त्याचा वापर दुष्काळाची सुरवातत्यामधील अंतराल आणि प्रमाण मोजण्यासाठी केला जावू शकतो.

       दुष्काळ प्रदेशाचे सीमांकन करताना जर वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला गेला नसेल तर त्यामुळे संसाधने  वास्तविक प्रभावित क्षेत्रामध्ये व लोकापर्यंत पोहचणार नाहीत. एका पद्धतशीर वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून दुष्काळाचे ऐतिहासिक  विश्लेषण केले गेल्यास दुष्काळग्रस्त क्षेत्र निश्चित करता येईल व नियोजनकारांना तातडीने योग्य ती कार्यवाही करता येईल. सध्या दुष्काळ परिभाषित करण्यासाठी किंवा विश्लेषित करण्यासाठी पूर्ण आणि व्यावहारिक दृष्टीकोन नाही. म्हणूनच दुष्काळाचे निरीक्षण आणि मुल्यांकनाच्या सर्व टप्प्यावर वैज्ञानिक पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे.

संदर्भ: (References)

 1. Food and Agriculture Organization of the united Nations, (2017), “Climate-Smart Agriculture,Proactive drought management”,  retrieved from http://www.fao.org/climate-smart-agriculture/knowledge/practices/drought/en/ 

2. Frederick, L., & Edward, T., (2012), “The Atmosphere, An Introduction to Meteorology”, PHI learning private limited, New Delhi, pp. 442 &443 

3. Indian Meteorological Department, retrieved from http://imd.gov.in/section/nhac/wxfaq.pdf 

4. Kapur, A., (2010), “Vulnerable India A Geographical study of disasters”, Sage publications, New Delhi, pp. 75-78

5. Karunakaran, N., (2008), “Droughts in India: Challenges & Initiatives”, Poorest Areas Civil Society Programme, New Delhi, pp.1 & 37

6. Ministry of Water Resources, (2014), “A brief on drought”, River development & Ganga Rejuvenation”, River development & Ganga Rejuvenation, Government of India, retrieved from http://wrmin.nic.in/forms/list.aspx?lid=312&Id=4http://wrmin.nic.in/forms/list.aspx?lid=312http://wrmin.nic.in/forms/list.aspx?lid=314 

7. Murthy, C., & Sesha, S., (2010), “Agricultural drought monitoring and assessment), Remote Sensing applications centre, NRSC, Hyderabad,      pp.303 &311 

8. Nagarajan, R., (2009), “Drought Assessment”, Springer, pp.1 

9. Thenkabail, P., Gamage, M., and Smakhtin, V., (2004), “The Use of Remote-Sensing Data for Drought Assessment and Monitoring in Southwest Asia”, International Water Management Institute, Colombo, Sri Lanka, pp. 5-7

10. Shikalgar, R. (2017) ; Drought Assessment and Monitoring Using Remote Sensing Data in Man River Basin, Maharashtra State, UGC, Minor Research Project