माण नदी खोऱ्यामध्ये (Man River Basin) एकूण ३४४ ग्रामीण वसाहती व ०२ नागरी वसाहती (म्हसवड व सांगोला) आढळतात. माण नदी खोऱ्यात ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण ९३.५५ टक्के असून नागरी लोकसंकख्येचे प्रमाण ६.४४ टक्के आहे. माण नदी खोऱ्यातील गावामध्ये सातारा जिल्हयातील माण व खटाव तालुक्यातील अनुक्रमे ९९ व ०३ वसाहतींचा समावेश होतो. सांगली जिल्ह्यातील जत, खानापूर, कवठे-महांकाळ व आटपाडी तालुक्यातील अनुक्रमे २९, ०८, १६ व ६० गावांचा समावेश होतो. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, व मंगळवेढा तालुक्यातील अनुक्रमे १५, ८९ व २५ गावांचा समावेश होतो. माण तालुक्यातील म्हसवड व सांगोला तालुक्यातील सांगोला या नागरी वसाहती आहेत.
माण नदी खोऱ्यात १०,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली ०७ गांवे असुन त्यामध्ये एकूण लॊकसंख्येपैकी १४.४६ टक्के लोकसंख्या निवास करते. ५,००० ते १०,००० लोकसंख्या असलेली २१ गांवे असून त्यामध्ये १५.९३ टक्के लोकसंख्या निवास करते. १००० ते २००० व २००० ते ५००० लोकसंख्या असलेली अनुक्रमे ११९ व ११५ गांवे असून त्यामध्ये अनुक्रमे २०.७० व ४२.७१ टक्के लोकसंख्या निवास करते. २०० ते ४९९ व ५०० ते ९९९ च्या दरम्यान लोकसंख्या असलेली अनुक्रमे १२ व ६७ गांवे असुन त्यामध्ये ०.४८ व ५.९९ टक्के लोकसंख्या निवास करते. २०० पेक्षा कमी लोकसंख्या असलेली ०३ गांवे असून त्यामध्ये ०.६३ टक्के लोकसंख्या निवास करते.
Please Read:
Please Read:
0 Comments