Introduction to GIS with QGIS (Marathi)

भौगोलिक माहिती प्रणाली (Geographic Information System - GIS) ही स्थानिक आकडेवारीचे संकलन, व्यवस्थापन, विश्लेषण व सादरीकरण यासाठी वापरली जाणारी अत्यंत उपयुक्त तांत्रिक पद्धती आहे. आज उपलब्ध असलेल्या विविध GIS सॉफ्टवेअरपैकी काही व्यावसायिक (Commercial) असून काही मुक्त-स्रोत (Open Source) स्वरूपात उपलब्ध आहेत. मुक्त-स्रोत सॉफ्टवेअरमध्ये QGIS हे विशेष लोकप्रिय असून आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापकपणे वापरले जाते. या अभ्यासक्रमामध्ये आपण QGIS च्या साहाय्याने GIS ची ओळख करून घेणार आहोत. या विभागामध्ये QGIS इंटरफेसमधील मेनू पट्टी, साधनपट्टी (Toolbar), नकाशा कॅनव्हास तसेच स्तर सूची (Layer List) या मूलभूत घटकांचे विवेचन करण्यात आले आहे.

👉 संपूर्ण व्हिडिओ येथे पाहा


Georeferencing in QGIS (Marathi)

जिओ-रेफरेन्सिंग (Georeferencing) ही प्रक्रिया म्हणजे रास्टर प्रतिमेतील प्रत्येक पिक्सेलला प्रत्यक्ष भौगोलिक स्थानाशी (Real World Coordinates) जोडणे होय. या प्रक्रियेमुळे स्कॅन केलेले अथवा डाउनलोड केलेले नकाशे वास्तव स्थान निर्देशांक प्रणालीमध्ये बसविणे शक्य होते. प्रस्तुत व्हिडिओमध्ये जिओ-रेफरेन्सिंगची संकल्पना, आवश्यक माहिती स्त्रोत तसेच QGIS या मुक्त-स्रोत सॉफ्टवेअरचा वापर करून नकाशांचे जिओ-रेफरेन्सिंग कसे करावे याचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे.

👉 संपूर्ण व्हिडिओ येथे पाहा


Digitization with QGIS (Marathi)

डिजिटायझेशन (Digitization) ही प्रक्रिया म्हणजे मुद्रित अथवा स्कॅन केलेल्या नकाशातील भौगोलिक वैशिष्ट्ये (Geographical Features) जसे की बिंदू, रेषा आणि बहुभुज यांचे संगणकीय स्वरूपात वेक्टर डेटामध्ये रूपांतर करणे. GIS क्षेत्रात ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून मॅन्युअल डिजिटायझिंग तसेच ऑन-स्क्रीन डिजिटायझिंग या दोन प्रमुख पद्धतींचा उपयोग केला जातो. प्रस्तुत व्हिडिओमध्ये QGIS च्या साहाय्याने डिजिटायझेशनची पद्धत चरणवार समजावून सांगण्यात आली आहे.

👉 संपूर्ण व्हिडिओ येथे पाहा


Preparation of Distribution Maps Using QGIS (Marathi)

वितरण नकाशे (Distribution Maps) म्हणजे सांख्यिकीय अथवा भौगोलिक घटकांचे वितरण नकाशावर दृष्य स्वरूपात प्रदर्शित करण्याची प्रक्रिया होय. या नकाशांच्या साहाय्याने एखाद्या घटकाचा प्रदेशानुसार घनता, प्रमाण किंवा सरासरी संख्या स्पष्ट करता येते. प्रस्तुत व्हिडिओमध्ये सांगली जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता छायापद्धती (Choropleth Method) वापरून कशी प्रदर्शित करता येते याचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले आहे. तसेच सांख्यिकीय आकडेवारीचे आलेख, आकृत्या आणि GIS साधनांच्या साहाय्याने नकाशावर प्रभावी सादरीकरण कसे करावे याची माहिती दिलेली आहे.

👉 संपूर्ण व्हिडिओ येथे पाहा