महाराष्ट्राचा भूगोल - स्थान, विस्तार आणि सीमा:
महाराष्ट्राचा भूगोल या विषयांतर्गत, महाराष्ट्राचे स्थान, विस्तार आणि सीमा या घटकाचा अभ्यास करणार आहोत. या घटकामध्ये महाराष्ट्राचा अक्षवृतीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार, महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ, महाराष्ट्र राज्याच्या नैसर्गिक सीमा त्याचबरोबर राजकीय सीमा या घटकांचा अभ्यास करणार आहोत.
महाराष्ट्र राज्याचे स्थान:
पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण १८० अक्षवृत्त आणि ३६० रेखावृत्ते आहेत. विषुववृत्त हे एक अक्षवृत्त आहे. विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागास उत्तर गोलार्ध आणि दक्षिणेकडील भागास दक्षिण गोलार्ध म्हणतात. मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेस पूर्व गोलार्ध आणि पश्चिमेस पश्चिम गोलार्ध आहे म्हणतात. नकाशात दर्शविल्याप्रमाणे, भारताचे स्थान उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये आहे. साहजिकच, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार उत्तर आणि रेखावृत्तीय विस्तार पूर्व असा दर्शिवला जातो.
महाराष्ट्र राज्य हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक महत्वाचे राज्य असून राज्याने भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिम, वायव्य व मध्य भाग व्यापलेला आहे. महाराष्ट्र राज्याचा अक्षवृत्तीय विस्तार १५ अंश ४४ मिनिटे उत्तर ते २२ अंश ६ मिनिटे उत्तर अक्षांश आहे. रेखावृत्तीय विस्तार ७२ अंश ३६ मिनिटे पूर्व ते ८० अंश ५४ मिनिटे पूर्व रेखांश असा आहे.
महाराष्ट्र राज्याचा विस्तार:
महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ८०० किमी. असून उत्तर-दक्षिण लांबी ७२० किमी इतकी आहे. महाराष्ट्र राज्याचे एकूण भोगोलिक क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ. कि. मी. इतके असून भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.36 टक्के क्षेत्र महाराष्ट्र राज्याने व्यापले आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा क्षेत्रफळाच्या बाबतीत राजस्थान आणि मध्यप्रदेश नंतर देशात तिसरा क्रमांक लागतो. राजस्थानचे क्षेत्रफळ ३,४२,२३९ चौ. कि. मी असून मध्यप्रदेश राज्याचे क्षेत्रफळ ३,०८,३१३ चौ. कि. मी. आहे.
महाराष्ट्र राज्याच्या नैसर्गिक सीमा:
महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस ७२० किमी लांबीचा अरबी समुद्र, गाळणा टेकड्या, व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या, उत्तर सीमेवर सातपुडा पर्वत व त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या, ईशान्येस दरेकासा टेकड्या, पूर्व सीमेवर भामरागड, सुरजागड व चिरोलगड डोंगर, आग्नेयेस इंद्रावती नदी, तसेच दक्षिण सीमेवर हिरण्यकेशी नदी व नैऋत्येस तेरेखोलची नदी आहे.
महाराष्ट्र राज्याच्या राजकीय सीमा:
महाराष्ट्र राज्याच्या वायव्येस गुजरात राज्य तसेच दमन-दिव, दादरा-नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश, उत्तरेस मध्यप्रदेश, पूर्वेस छत्तीसगड, आग्नेयेस तेलंगाना, दक्षिणेस कर्नाटक व नैऋत्येस गोवा राज्याच्या सीमा आहेत. अशाप्रकारे, महाराष्ट्राला एकूण ६ घटकराज्ये व दादरा-नगर हवेली या एका केंद्रशासित प्रदेशांची सीमा लागून आहे तसेच महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा मध्यप्रदेश राज्याला लागून असून सर्वात कमी सीमा गोवा राज्याला लागून आहे.
मध्यप्रदेश राज्याला लागून असलेल्या जिल्ह्यांच्या सीमा:
मध्यप्रदेश राज्याला महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया अशा ०८ जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत.
छत्तीसगड राज्याला लागून असलेल्या जिल्ह्यांच्या सीमा :
छत्तीसगड राज्याला गोंदिया व गडचिरोली
या २ जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत.
तेलंगाना राज्याला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड या ०४ जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत.
कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग अशा ०७ जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत.
गोवा राज्यास लागून असलेल्या जिल्ह्यांच्या सीमा:
गोवा राज्यास फक्त सिंधुदुर्ग या एकाच जिल्ह्याची
सीमा लागून आहे.
गुजरात राज्याला लागून असलेल्या जिल्ह्यांच्या सीमा:
गुजरात राज्याला पालघर, नाशिक, धुळे व नंदुरबार अशा ०४ जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. पालघर जिल्ह्याला लागून दादरा-नगर हवेली या एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे.
अशाप्रकारे, महाराष्ट्रातील एकूण २० जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागून असून एका जिल्ह्याची सीमा केंद्रशासित प्रदेशाला लागून आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक ०८ जिल्ह्यांची संख्या मध्यप्रदेश या राज्याला लागून आहे.
शेजारील राज्यांना सलग्न नसलेले जिल्हे:
महाराष्ट्रातील
१६ जिल्ह्यांची सीमा इतर कोणत्याही राज्यांना लागून नाही. त्यापैकी ठाणे, मुंबई
शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी या ०५ जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे.
उर्वरित पुणे, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, वाशीम,
अकोला व वर्धा या ११ जिल्ह्यांना कोणत्याही घटक राज्याची व नैसर्गिक सीमा लाभलेली
नाही.
अशाप्रकारे, सर्वात जास्त ०८ जिल्ह्यांची सीमा
मध्यप्रदेश राज्यासा सलग्न असून सर्वात कमी ०१ जिल्ह्याची सीमा गोवा राज्यास सलग्न
आहे. याशिवाय कर्नाटक राज्यास ०७ जिल्ह्यांची सीमा, गुजरात आणि तेलंगाना राज्यास प्रत्येकी ०४ जिल्ह्याची सीमा, छत्तीसगड राज्यास ०२ जिल्ह्यांची सीमा सलग्न
आहे. याशिवाय शेजारील राज्यास १६ जिल्ह्याच्या सीमा सलग्न नसून त्यापैकी ०५
जिल्ह्यांच्या सीमेस समुद्रकिनारा लाभलेला आहे. उर्वरित ११ जिल्ह्यांना कोणत्याही घटक राज्याची अथवा नैसर्गिक सीमा लाभलेली नाही.
महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार, धुळे, गोंदिया, गडचिरोली, नांदेड, सिंधुदुर्ग आणि पालघर या ०७ जिल्ह्यांचा सीमा सलग दोन राज्यांना सलग्न आहेत. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांच्या सीमा गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्याशी सलग्न आहेत. गोंदिया जिल्ह्याची सीमा मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्याशी सलग्न आहे. गडचिरोली या जिल्ह्याची सीमा छत्तीसगड आणि तेलंगाना या राज्याशी सलग्न आहे. नांदेड जिल्ह्याची सीमा तेलंगाणा आणि कर्नाटक राज्याशी सीमा सलग्न आहे. सिंधुदुर्ग या जिल्ह्याची कर्नाटक आणि गोवा राज्याशी सलग्न आहे. तसेच पालघर या जिल्ह्याची सीमा गुजरात राज्य आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशासी सलग्न आहे. उर्वरित नाशिक, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर या १३ जिल्ह्यांना एकाच राजकीय घटकाची सीमा सलग्न आहे.
महाराष्ट्र राज्याला लागून २० जिल्ह्यातील 79 तालुक्याच्या सीमा सलग्न आहेत. महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त २४ तालुक्यांच्या सीमा मध्यप्रदेश राज्याला सलग्न असून सर्वात कमी ०२ तालुक्यांच्या सीमा गोवा राज्यास सलग्न आहेत.
दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाला पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू आणि जव्हार या ०३ तालुक्यांच्या सीमा सलग्न आहेत.
पालघर जिल्ह्यातील तलासरी व जव्हार हे ०२ तालुके, नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, कळवण, बागलाण हे ०५ तालुके, धुळे जिल्ह्यातील साक्री हा ०१ तालुका, नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि अक्राणी हे सर्वच ०६ तालुके असे एकूण १४ तालुक्यांच्या सीमा गुजरात राज्याशी सलग्न आहेत.
मध्यप्रदेश राज्यास सलग्न असलेल्या तालुक्यांची सीमा:
नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी, शाहदा हे ०२ तालुके, धुळे जिल्ह्यातील शिरपूर
हा ०१ तालुका, जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर हे ०४ तालुके,
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद,
संग्रामपूर हे ०२ तालुके, अमरावती जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा, अचलपूर, चांदूर
बाजार, मोर्शी, वरुड हे ०६ तालुके, नागपूर जिल्ह्यातील नरखेड, सावनेर, पारशिवनी,
रामटेक हे ०४ तालुके, भंडारा जिल्ह्यातील तुमसर हा ०१ तालुका, गोंदिया जिल्यातील
तिरोडा, गोंदिया, आमगाव आणि सालेकसा हे ०४ तालुके असे एकूण २४
तालुक्यांच्या सीमा मध्यप्रदेश राज्याशी सलग्न आहेत.
छतीसगड राज्यास सलग्न असलेल्या तालुक्यांची सीमा:
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, देवरी हे ०२ तालुके, गडचिरोली
जिल्ह्यातील कोरची, धानोरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा हे ०६ तालुके असे एकूण ०८
तालुक्यांच्या सीमा छत्तीसगड राज्याशी सलग्न आहेत.
तेलंगाना राज्यास सलग्न असलेल्या तालुक्यांची सीमा:
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, अहेरी, मुलचेरा, चामोर्शी हे ०४ तालुके,
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी, राजुरा, जिवती, कोरपना, झरी जामणी हे
०५ तालुके, यवतमाळ जिल्यातील केळापूर, घाटंजी हे ०२ तालुके, नांदेड
जिल्ह्यातील किनवट, हिमायतनगर, भोकर, उमरी, धर्माबाद, बिलोली आणि देगलूर
हे ०७ तालुके असे एकूण १८ तालुक्यांच्या सीमा तेलंगाना राज्याशी सलग्न आहेत.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर, मुखेड हे ०२ तालुके, लातूर जिल्ह्यातील उदगीर, देवणी, निलंगा हे ०३ तालुके, उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर हे ०२ तालुके, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मंगळवेढे हे ०३ तालुके, सांगली जिल्ह्यातील जात, कवठे महांकाळ, मिरज हे ०३ तालुके, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणगले, कागल, गडहिंग्लज आणि चंदगड हे ०५ तालुके, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग हा ०१ तालुका असे एकूण १९ तालुक्यांच्या सीमा कर्नाटक राज्याशी सलग्न आहेत.
गोवा राज्यास सलग्न असलेल्या तालुक्यांची सीमा:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि सावंतवाडी या ०२ तालुक्यांच्या
सीमा गोवा राज्याशी सलग्न आहेत.
सलग दोन राज्यांना सलग्न असलेल्या तालुक्यांच्या सीमा:
महाराष्ट्र राज्यातील तलासरी, जव्हार, अक्राणी, शहादा, सालेकसा, सिरोंचा,
आहेरी, देगलूर आणि दोडामार्ग या ०९
तालुक्यांच्या सीमा सलग दोन राज्यांना
सलग्न आहेत. तलासरी आणि जव्हार तालुक्याची सीमा गुजरात राज्य आणि दादरा नगर हवेली या
केंद्रशासित प्रदेशाशी सलग्न आहे. शहादा आणि अक्राणी या २ तालुक्यांच्या सीमा
गुजरात आणि मध्यप्रदेश राज्याशी सलग्न आहे. सालेकसा या तालुक्याची सीमा मध्यप्रदेश
आणि छत्तीसगड या राज्याशी सलग्न आहे. सिरोंचा आणि अहेरी या ०२ या तालुक्याची सीमा
छत्तीसगड आणि तेलंगाना या राज्याशी सलग्न आहे. देगलूर तालुक्याची सीमा तेलंगाना
आणि कर्नाटक राज्य तसेच दोडामार्ग या तालुक्याची सीमा कर्नाटक आणि गोवा राज्याशी
सलग्न आहेत.
थोडक्यात,
महाराष्ट्र राज्य हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक महत्वाचे राज्य असून
राज्याने भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिम,
वायव्य व मध्य भाग व्यापलेला आहे. महाराष्ट्र राज्याचा अक्षवृत्तीय विस्तार १५ अंश
४४ मिनिटे उत्तर ते २२ अंश ६ मिनिटे उत्तर
अक्षांश आहे. रेखावृत्तीय विस्तार ७२ अंश ३६ मिनिटे पूर्व ते ८० अंश ५४ मिनिटे
पूर्व रेखांश असा आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ८०० किमी. असून
उत्तर-दक्षिण लांबी ७२० किमी इतकी आहे. महाराष्ट्र
राज्याचे एकूण भोगोलिक क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ. कि. मी. इतके असून भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.36
टक्के क्षेत्र महाराष्ट्र राज्याने व्यापले आहे. महाराष्ट्र राज्याच्या
पश्चिमेस ७२० किमी लांबीचा अरबी समुद्र, गाळणा टेकड्या, व
सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या, उत्तर सीमेवर सातपुडा पर्वत व त्याच्या पूर्वेस गाविलगड
टेकड्या, ईशान्येस दरेकासा टेकड्या, पूर्व
सीमेवर भामरागड, सुरजागड व
चिरोलगड डोंगर, आग्नेयेस इंद्रावती नदी, तसेच
दक्षिण सीमेवर हिरण्यकेशी नदी व नैऋत्येस
तेरेखोलची नदी आहे.महाराष्ट्र राज्याच्या वायव्येस
गुजरात राज्य तसेच दमन-दिव व दादरा-नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश, उत्तरेस मध्यप्रदेश, पूर्वेस छत्तीसगड, आग्नेयेस तेलंगाना, दक्षिणेस कर्नाटक व नैऋत्येस
गोवा राज्याच्या सीमा आहेत. महाराष्ट्रातील एकूण २० जिल्ह्यांची सीमा इतर
राज्यांना लागून असून एका जिल्ह्याची सीमा केंद्रशासित प्रदेशाला लागून आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक ०८ जिल्ह्यांची
सीमा मध्यप्रदेश या राज्याला लागून आहे. महाराष्ट्र राज्याला लागून २० जिल्ह्यातील 79
तालुक्याच्या सीमा सलग्न आहेत. महाराष्ट्र
राज्यातील सर्वात जास्त २४ तालुक्यांच्या सीमा मध्यप्रदेश राज्याला सलग्न असून
सर्वात कमी ०२ तालुक्यांच्या सीमा गोवा राज्यास सलग्न आहेत.
0 Comments